बारामती, (प्रतिनिधी) – पूलक मंच परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन अधिवेशनात सर्वोत्कृष्ट शाखा म्हणून बारामती शाखेने बहुमान मिळविला आहे. भारत गौरव आचार्य श्री पूलकसागरजी गुरुदेव यांच्या आशीर्वादने झूम-ऍप माध्यमातून झोन-7 चे क्षेत्रीय ऑनलाइन अधिवेशन रविवारी (दि. 31 मे) यशस्वीरीत्या पार पडले.
राष्ट्रीय जैन महिला जागृती मंचाचे महामंत्री प्रियंका दोशी यांनी ही माहिती दिली. करोना महामारी संकट आणि लॉकडाऊन असल्याने पूलक मंच परिवार झोन-7 च्या 15 व्या क्षेत्रीय अधिवेशनचे आयोजन झूमऍपच्या माध्यमातून करण्यात आले होते. पूलक मंच परिवार शाखा झोन-7 अंतर्गत पुणे, औरंगाबाद, नातेपुते, नीरा, लोणंद, बारामती या शाखेचे अध्यक्ष, महामंत्री व दोन-दोन उत्कृष्ट कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी झाले होते. या अधिवेशनामध्ये आचार्य पूलकसागरजी गुरुदेव यांनी सर्वांना ऑनलाइन दर्शन, आशीर्वाद आणि मार्गदर्शन केले.
गुरुदेव ऑनलाइन येताच सर्व शाखेच्या सदस्यांनी गुरुदेव यांना अघ्य समर्पित केले. गुरुदेव यांच्या उद्बोधनानंतर गुरूदेव यांची ऑनलाइन आरती करण्यात आली. अधिवेशनाचे मुख्य अतिथी पुण्याच्या प्रमुख समाज सेविका शोभा धारिवाल उपस्थित होत्या, तसेच पूलक मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद फांदोत, महामंत्री प्रदीप जैन, कार्याध्यक्ष सुनील काला, अंकित जैन, चंद्र प्रकाश बौद, तसेच महिला मंचाचे राष्ट्रीय अध्यक्षा मीना झाझरी, महामंत्री बिना टोंग्या, कार्यध्यक्षा पूनम विनायका यांसह राष्ट्रीय पूलक मंचचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. झोन-7 अधिवेशनात सहभागी झालेल्या सर्व शाखेचे अध्यक्ष, महामंत्री यांनी केलेल्या कामाचे तपशील देण्यात आले. त्यानंतर लगेच राष्ट्रीय कार्यकारिणीने सर्व शाखांचे कामाचे तपशीलवार करुन राष्ट्रीय अध्यक्ष व अध्यक्षांना पारितोषिक जाहीर केले.
पूलक मंच सर्वश्रेष्ठ शाखाचे मानकरी पूलक मंच परिवार शाखा बारामती यांना प्रदान करण्यात आले. बारामती पूलक मंचचे मोरेश्वर पाठक व अमोल दोशी व महिला मंचचे संगीता वाघोलीकर, कीर्ती पहाडे यांना शाखेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय कार्यकारी यांनी विशेष सन्मानित करण्यात आले. अधिवेशनचे संचालन प्रियंका दोशी यांनी केले. अधिवेशन यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष डॉ. वर्षा कोठारी, अध्यक्ष अतुल गांधी, महामंत्री प्रियांका दोशी, महामंत्री वा. ल. शहा (वाघोलीकर) यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सर्व ऑनलाइन संगणक निगडित सेवेसाठी अनेकांत इंग्लिश स्कूलचे राजेंद्र सरगर यांनी सहकार्य केले.