रिलायन्स म्युच्युअल फंड आता निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड

रिलायन्स म्युच्युअल फंड ही असेट मॅनेजमेंट कंपनी निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड या नावाने ओळखली जाणार आहे. रिलायन्स निप्पॉन लाईफ असेट मॅनेजमेंट कंपनीतील 75 टक्के हिस्सा जपानमधील निप्पॉन लाईफ इन्शुरन्स कंपनीने विकत घेतल्याने हा बदल झाला आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी काही काळजी करण्याची गरज नाही. फक्त नावातील बदल लक्षात घेणे गरजेचे आहे.

निप्पॉन लाईफ ही जपानमधील एक मोठी लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे आणि जगभर वित्तविषय सेवा पुरवते. सध्या कंपनी 700 अब्ज डॉलर एवढ्या संपत्तीचे व्यवस्थापन करत आहे. 130 वर्षांची ही कंपनी गेली अनेक वर्षे रिलायन्सबरोबर काम करत आहे आणि या क्षेत्रातील अनेक बडे अधिकारी त्यांच्यासोबत आहेत.

रिलायन्स म्युच्युअल फंडातील विविध योजनांमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली असेल त्यांच्या योजना तशाच पुढे चालू राहणार आहेत. फंड मॅनेजरमध्येही फार मोठे बदल होण्याची चिन्हे नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.