मुंबई – बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत लवकरच ‘धाकड’ चित्रपटात दिसणार आहे. कंगना सध्या तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटातील ‘शी इज ऑन फायर’ हे पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. या व्हिडिओमध्ये कंगना राणावतचा हॉट अँड बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
बादशहाने आवाज दिला
कंगना राणावतच्या ‘धाकड’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज होण्यापूर्वी ट्रेलर करण्यात आला होता. यामध्ये कंगना बोल्ड अवतारात दिसत आहे. कंगनाच्या या गाण्याला बादशाह आणि निकिता गांधी यांनी आवाज दिला आहे. या गाण्यात कंगनासोबत रॅपर बादशाह आणि अर्जुन रामपाल देखील दिसत आहेत.
View this post on Instagram
कंगना हॉट लूकमध्ये दिसली
या गाण्यातील कंगनाचा दमदार लूक चाहत्यांना आवडला आहे. गाण्यात ती किलर स्टाईलमध्ये दिसत आहे. कंगनाचे हे गाणे तिच्या लुकला खूप साजेसे आहे. या गाण्यात कंगना कधी फायरिंग करताना तर कधी तिची कडक स्टाइल प्रेक्षकांना दाखवताना दिसत आहे.
View this post on Instagram
30 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे
गाणे रिलीज होताच, चाहत्यांना इतके आवडले आहे की, यूट्यूबवर आतापर्यंत ३ कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ गेल्या काही तासातच पाहिला आहे.