मुंबई – हरियाणवी डान्सर सपना चौधरीच्या डान्सचे आज सगळ्यांनाच वेड लागले आहे. आज सपनाच्या गाण्यांवर मुली असोत किंवा मुलं नाचताना दिसतात. सपनाच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
सपनाला डान्स करताना तुम्ही सर्वांनी खूप पाहिले असेल, पण आता सपनाचा एक वेगळा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती डान्स करताना नाही तर रोमान्स करताना दिसत आहे.
View this post on Instagram
सपना चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. सपना तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कधी कधी डान्सचे व्हिडिओ आणि फोटोशूटचे व्हिडिओ शेअर करत असते, पण आता तिने पती वीर साहू सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वीरसोबत गच्चीवर रोमान्स करतांना दिसत आहे. सपनाने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘हार्ट बीट’ असे लिहिले आहे.
सपना – वीर ही जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडते. आत्तापर्यंत या व्हिडिओला 30 हजारांहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स आल्या आहेत. इतकंच नाही तर प्रेक्षकांनी कमेंट करत या दोघांची परफेक्ट जोडी असल्याचं सांगितलं आहे. प्रेक्षकांनी perfect jodi ever, made for each other कमेंट केल्या आहेत.