नवी दिल्ली – व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 1 जानेवारीपूर्वी अल्प कपात करण्यात आली आहे. आजपासून व्यावसायिक सिलिंडर 39.50 रूपयांनी स्वस्त झाले आहे.
मात्र, घरगुती सिलिंडर ९०३ रुपयांवर कायम ठेवण्यात आला आहे. आता दिल्लीत इंडेन कमर्शियल सिलिंडर 1757 रूपयांना मिळणार आहे. यापूर्वी ते 1796.50 रूपयांना उपलब्ध होते.
कोलकात्यात याच सिलेंडरची किंमत आता 1868.50 रूपये आहे. 1 डिसेंबरपासून कालपर्यंत तो 1908 रूपयांना विकला गेला. आता मुंबईत हाच सिलिंडर 1749 ऐवजी 1710 रूपयांना मिळणार आहे.