दुधाच्या पिशवीची पुर्नवापर प्रक्रिया महिनाभरात

पिशवी परत केल्यावर 50 पैसे मिळणार : 31 टन कचरा कमी होणार

मुंबई – राज्यात प्लॅस्टिक बंदी असताना राज्यात दररोज 1 कोटी दुधाच्या पिशव्याचा खच रस्त्यावर पडलेला असतो. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी दुधाच्या पिशव्यांचा पुर्नवापर महिन्याभरात केला जाणार आहे. त्यानुसार दूध विक्रेत्यांकडे 50 पैसे डिपॉझिट ठेवल्यानंतर दूधपिशवी ग्राहकांना मिळणार आहे. त्यानंतर दुसछया दिवशी रिकामी दूधपिशवी परत केल्यानंतर 50 पैसे ग्राहकांना परत मिळणार आहे. पुर्नवापराच्या प्रक्रियेमुळे 31टन दूध पिशव्यांचा कचरा कमी होणार आहे.

विधानसभेत प्लॅस्टिक बंदीबाबत आमदार मंगलप्रभात लोढा, सुनील प्रभू, अबू आजमी यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले, प्लॅस्टिक पूर्णत: बंदी करण्याची शासनाची भूमिका आहे. मी स्वतः महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर जाऊन ट्रक पकडले, गोडाऊनवर धाडी टाकल्या, एक लाख 20 हजार मेट्रिक टन प्लॅस्टिक गोळा केले. 986 मेट्रिक टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले, आता त्या प्लॅस्टिकवर 24 कंपन्या दिवसाला 550 मेट्रिक टन रिसायकल करण्याचे काम करत आहेत.

प्लॅस्टिकबंदीमुळे आजतागायत 11 हजार 200 टन प्लास्टिक कचरा निर्माण व्हायचा तो आता फक्त 600 टन इतका निर्माण होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाछयांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत केलेल्या संयुक्त कारवाईत 6 हजार 369 दुकानांवर कारावाई करण्यात आली असून, 4 कोटी 12 लक्ष 20 हजार 588 एवढा दंड गोळा केला. 836 टन इतका प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला.

सिमेंटमध्ये प्लॅस्टिकचा वापर

सिमेंट कंपन्या एल अँड टी अंबुजा सिमेंट अशा कंपन्यांना तीन हजार मेट्रिक टन प्लॅस्टिक देऊन त्याचा वापर सीमेंटमध्ये करण्यात यावा अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

रस्ते बनविण्यासाठी वापरल्या जाणाछया मटेरिअलध्येहीी प्लास्टिकचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यामध्ये सात टक्के वरचा थर प्लास्टिकचा दिला जावा, असे आदेश केंद्र सरकारने रस्ते विकास विभागाला दिले असल्याची माहिती कदम यांनी सभागृहात दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)