लढाऊ विमानाला पक्ष्याची धडक

वैमानिकाने सुरक्षित उतरण्यासाठी फेकला बॉम्ब

अंबाला- हरियाणाच्या अंबाला हवाईदलाच्या विमानतळावर लढाऊ विमानाचा अपघात टळला. जग्वारच्या या विमानाने गुरुवारी सकाळी 7.20 मिनिटांनी उड्डाण केले होते. मात्र, काही वेळातच विमानाला पक्षी आदळला यामुळे इंजिनाला नुकसान झाले.

मात्र, वैमानिकाने शहराच्या बलदेव नगरमध्ये विमानाच्या बाहेरची इंधन टाकी आणि 10 किलोचा सरावासाठीचा बॉम्ब खाली टाकत विमान सुरक्षित उतरविले. हा बॉम्ब ताब्यात घेण्यात आला असून संबंधीत अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इंधनाच्या टाकीचे अवशेष पडल्यामुळे जोरात आवाज झाला. आम्ही झोपेत होतो. आवाजाने जाग आली. त्यावेळी पाहिले की आजुबाजुच्या घरांमध्ये टाकिचे काही अवशेष पडले होते. त्यामुळे काही घरांच्या भिंतींना तडे गेले.

तर डीएसपी रजनीश शर्मा यांच्यासमवेत अनेक पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पायलटनी आपत्कालीन लॅंडिंग केली. यावेळी अपघाताच्या वेळी खाली टाकण्यात आलेल्या वस्तूंचे अवशेष जमा करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.