साहित्य : दोन वाट्या मैदा, अर्धा चमचा मीठ, दोन चमचे तेल, शंभर ग्रॅम पनीर, बटर, पाणी
कृती : मीठ, तेल, किसलेले पनीर घालून मैदा भिजवून घ्यावा. घट्ट भिजवावा. लहान लाट्या करून फुलक्याच्या आकाराचे पराठे लाटून तव्यावर बटर सोडून भाजून घ्यावेत. मोरंबा, चटणी, लोणचे, सॉसबरोबर खाण्यास द्यावे.