साहित्य :
(१) दोन वाटयासोललेलेमटार (२) अर्धा चमचा मीठ (३) एक चमचा गोडा मसाला (४) सुपारीएवढा गूळ (५) कोथिंबीर-कढीपत्ता
फोडणीचे साहित्य
(२) चार चमचे तेल (२) अर्धा चमचा मोहरी (३) अर्धा चमचा हळद (४) पाव चमचा हिंग
कृती :
हिंग, हळद, कढीपत्याची फोडणी करून त्यात मटार घालावेत. नंतर थोडे पाणी घालून त्यात मीठ, गूळ, तिखट मसाला घालावा. मंद विस्तवावर झाकण ठेवून चांगले शिजवावे. वरून कोथिंबीर घालावी. एवढी उसळ दोन माणसांनापुरते.