पिंपळे गुरव, (वार्ताहर) – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी पादुका सोहळा दापोडी येथे येताच भाविकांनी पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले.
या वेळी सकाळी सनई चौघडा वाजून स्वागत करण्यात आले. सायंकाळी पालखी प्रदक्षिणा करताना फिरंगाई देवीच्या येथे महारती करण्यात आली. या वेळी दापोडी परिसरातील श्री स्वामी समर्थ भक्तांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
या वेळी वरसुबाई महिला लेझीम पथक भिवाडे खुर्द यांनी आदिवासी नृत्य सादर करून सर्वांचे मन जिंकले. दानपट्टा, घोडे, उंट व लहान मुलांनी पालखी खांद्यावर घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले. श्रींची महाआरती महिलांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी, दीपाली संजय कणसे, सारिका काळभोर, रत्नमाला दूधभाते, हेमा शिरसागर, केशर कांबळे, हर्षदा जवळकर या महिलांच्या हस्ते करण्यात आली.
अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजय कणसे यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. या वेळी महिलांनी भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. सकाळी महा अभिषेक, सुनीता कांबळे यांच्या हस्ते तर पादुका पूजनाचा व महाअभिषेक योगिराज कणसे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर फुगेवाडी येथील स्वामी समर्थ मठामध्ये पालखी विराजमान झाली.