नारायणगाव, (वार्ताहर) – पुणे जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव (ता. जुन्नर) पतसंस्थेची संचालक मंडळाची 2024 ते 2028-2029 वर्षांकरिता पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जुन्नर चे सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर व संतोष भुजबळ यांनी काम पाहिले. नवनियुक्त संचालक म्हणून दीपक खैरे, राजेंद्र पाटे, सदानंद खैरे, विलास वाजगे, प्रभाकर तट्टू , अशोक पाटे, संग्राम फुलवडे , एकनाथ शेटे, सुनिल भुजबळ , प्रशांत खैरे, डॉ. रवींद्र गिरी,
डॉ पंकज वाव्हळ, अभय कोठारी, मिना भोर, रुपाली पाटे बिनविरोध निवडून आले आहेत. संचालक मंडळाने अध्यक्षपदी दीपक खैरे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील तर सचिव सदानंद खैरे यांची निवड केली. यावेळी संस्थेचे संस्थापक गणपत फुलावडे, मार्गदर्शक संतोष खैरे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन तोडकरी व कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेची आर्थिक परिस्थिती
ठेवी 126 कोटी, कर्ज वाटप 95 कोटी, नफा 1 कोटी 54 लाख, सभासद 8 हजार 500, सभासदांना लाभांश 10 टक्के, भेटवस्तू व दोन लाखांचे सुरक्षा कवच.