अक्कलकोट – महाराष्ट्राचा प्रसिद्ध हास्य कलाकार भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके यांचा चला हवा येऊ द्या फेम ‘रंग विनोदाचे, रंग सुरांचे’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सामाजिक, राजकीय चालू घडामोडीवर विनोदातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याबरोबरच विविध गाण्याने रसिकांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, सायंकाळी ७ वा. चला हवा येऊ द्या फेम ‘रंग विनोदाचे, रंग सुरांचे’ सादरकर्ते – श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, मेघना एरंडे व गायक- स्वप्नील गोडबोले, योगिता गोडबोले आणि सहकारी मुंबई ह्या कार्यक्रमाने ८ वे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, सोलापूरचे धर्मादाय उपायुक्त सुनिता कंकणवाडी, सोलापूर जि.प. मुख्यकार्यकारी धिकारी दिलीप स्वामी, सोलापूरचे जेष्ठ विधिज्ञ अॅड. नितीन हबीब, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, संदीप फुगे-पाटील, अकलूज येथील सहारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचे कार्यकारी अध्यक्षा डॉ. श्रद्धा जंज्वाळ, अभियंता राजेश निलवाणी, कॉंग्रेस शहर अध्यक्ष रईस टीनवाला, भारतीय स्टेट बँकचे क्षेत्रीय प्रबंधक निशांतकुमार जयस्वाल, नगर रचना विभागाचे नारायणराव जोशी, सुनील देशपांडे व श्रीमती मल्लम्मा पसारे, समीर लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.