रियल माद्रिदला पुन्हा पराभवाचा धक्‍का !

माद्रिद: झेनेदिन झिदान प्रशिक्षक झाल्यावरही रियल माद्रिदच्या अडचणी कमी झाल्या नसून त्यांना ला लीग फुटबॉल स्पर्धेत वेलेंसिया संघाविरुद्ध त्यांना 2-1 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला आहे. वेलेन्सिया साठी 35 आणि 83 व्या मिनिटाला गोल मिळवले गेले तर माद्रिदसाठी करीम बेंझिमा ने 90+3 व्या मिनिटाला गोल केला.
पाहिल्या सत्रात वेलेंसिया चा दबदबा राहिला. मध्यरक्षक आणि आघडीपटू मधील नियोजित खेळामूळे त्यांच्या आक्रमणाची धार वाढली. 35 व्या मी. जी. गिडेस ने गोल करत वेलेंसियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाहिल्या सत्रात आणखी गोल होऊ शकला नाही.

दुसऱ्या सत्रात माद्रिदने आक्रमक खेळ करण्यावर भर दिला. परंतु , गोल करण्यात त्यांना अपयश आले. 83 व्या मी. वेलेंसियासाठी दुसरा गोल नोंदवन्यात आल्यावर माद्रिद चां पराभव निश्‍चित झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.