डीएसकेंची नार्को टेस्ट करा; गुंतवणूकदारांची मागणी

पुणे – “प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके यांनी आमचा पैसा इतरत्र वळवून आमची फसवणूक केली आहे. डीएसके हे वेळोवेळी न्यायालयाची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे डीएसके यांनी ठेवीदारांच्या पैशाचा विनीयोग कसा केला? याचा तपास करण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी,’ अशी विनंती गुंतवणूकदारांनी केली.

विशेष न्यायाधीश डी. जी. मुरूमकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सोमवारी (दि. 8) झाली. दरम्यान, “रखडलेले सर्व प्रकल्प विकसनासाठी “म्हाडा’कडे दिले, तर ते 15 महिन्यांच्या कालावधीमध्ये ते पूर्ण होऊ शकतात,’ असे डी.एस.के. यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, “डी.एस.के. यांच्यावर बॅंकांचे कर्ज असून, त्यांच्याकडे फंड उपलब्ध नाही. त्यांचे अनेक प्रकल्प हे गेल्या कित्तेक वर्षांपासून रखडलेले आहेत. त्यामुळे हे प्रकल्प 15 महिन्यांमध्ये कसे पूर्ण होऊ शकतात,’ असा सवाल विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला.

दरम्यान, “डी.एस.के. हे नेहमी प्रमाणे खोटे बोलत असून, न्यायालयाचीा दिशाभूल करत आहेत. फंड उपलब्ध नसल्याने ते प्रकल्प पूर्ण करू शकत नाही. त्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे,’ अशा शब्दांमध्ये गुंतवणूकदारांनी नाराजी व्यक्‍त केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी दि.22 एप्रिल रोजी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.