मुंबई – पाठदुखीतून पूर्णपणे तंदुरुस्त ठरलो असून, आगामी आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज आहे, असे मत अष्टपैलू हार्दिक पंड्या याने व्यक्त केले आहे.
काही दिवसांपासून मी कुटुंबीयासमवेत आनंदाने वेळ घालवत होतो. या काळात तंदुरुस्तीवरही भर देत होतो. चांगली तयारी करण्यासाठी माझ्याकडे खूप वेळही होता. सध्या मात्र सकारात्मक विचाराने पुढे जात आहे. ज्या गोष्टी नियंत्रणात आहेत, त्यावरच लक्ष केंद्रित करत आहोत. गुजरात सुपर जायंट्सचे नेतृत्व करताना संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा मी प्रयत्न करीन, असेही पंड्याने सांगितले. त्याने भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी आयपीएल हा सर्वोत्तम मार्ग आहे, असेही पंड्या म्हणाला.