पुणे – बाजारात पालेभाज्यांना मागणी नसल्याने भाव घटले आहेत. मेथी 7-8 रुपये, शेपू 3 रुपये, कांदापात 10 रुपये, पुदिना, चुका, चवळई, अंबाडी अनुक्रमे 2 ते 3 रुपये, मुळे 8-10 रुपयांनी भावात घट झाल्याची माहिती आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी सांगितले.
रविवारी बाजारात कोथिंबिरीची दीड लाख जुडी, मेथी दीड लाख जुडीची आवक झाली. बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची आवक चांगल्या प्रमाणात झाली. त्यामुळे सर्व प्रकारच्या पालेभाज्यांमध्ये 30-40 टक्क्यांनी भावात घट झाली आहे.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 300-700, मेथी : 300-500, शेपू : 300-600, कांदापात : 100-1300, चाकवत : 500-600, करडई : 400-500, पुदिना : 200-300, अंबाडी : 300- 400, मुळे : 800-1000, राजगिरा : 300-500, चुका : 600-500, चवळई : 500-600, पालक : 400-500.