पिंपरी – केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने एक रकमी रोख 50 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याकरिता या उमेदवारांनी बार्टीचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकारिता स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरिता दर वर्षी मार्गदर्शन व आर्थिक साह्य देण्यात येते.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा पूर्व परीक्षा 4 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 23 ऑक्टोबरला आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे.
ही पूर्व परीक्षा पास झालेले अनुसूचित जातीचे उमेदवार बार्टीच्या निकषात बसत असतील, तर त्यांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.