जीवनातले सर्व आनंद एकीकडे आणि मनासारखी नौकरी मिळण्याचा आनंद एकीकडे! असं म्हंटलं जातं. याचीच प्रचिती आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओद्वारे आली आहे. सोशल मीडियावर सध्या एका डान्स करणाऱ्या युवतीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. युवतीच्या आनंदामागे मनासारखा जॉब मिळाला हे कारण असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर युवती नौकरी मिळवण्यासाठी एका ऑफिसमध्ये मुलाखत द्यायला गेली होती. तिथे तिला नौकरी देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर युवती ऑफिसच्या बाहेर पडली. पार्किंग एरियामध्ये येऊन तिने आजूबाजूला कोणी नाहीये ना? याची खात्री केली. अवतीभोवती कोणीच नसल्याची खात्री पटल्यानंतर तिने मनसोक्त डान्स करत आपला आनंद व्यक्त केला.
मात्र आपण सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असल्याची बाब ती विसरली होती. त्या युवतीचा डान्स तिथेच काम करणाऱ्या एका अन्य सहकाऱ्याने पाहिला. तरुणीच्या डान्सचे सिसिटीव्ह फुटेज त्यांनी सोशल मीडियावर टाकत तिचा आनंद साऱ्या दुनियेसोबत शेअर केला.
आता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत ५ मिलियन लोकांनी पाहिला आहे. नवी नौकरी मिळालेल्या या युवतीवर शुभेच्छांचा पाऊस पडला असून या व्हिडिओला ५ लाखांपेक्षा अधिक कमेंट्स आल्या आहेत. आपला व्हिडीओ व्हायरल झाल्याचे संल्यानंतर खुद्द युवतीनेही यावर कमेंट केली आहे.
ती म्हणते, “मला वाटलं आजूबाजूला कोणीच नाही, मात्र मी चुकीची होते. सर्वांचे खूपखूप धन्यवाद!”
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा व अशाच व्हायरल बातम्यांसाठी दैनिक प्रभातच्या वेबसाईटवरील लाईफस्टाईल कॅटेगिरीला व्हिसिट करा.