नवी दिल्ली -ज्येष्ठ नेते डी.राजा यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली. (D Raja re-elected CPI general secretary for second term) राजा जुलै 2019 मध्ये पहिल्यांदा पक्षाचे सरचिटणीस बनले. सुधाकर रेड्डी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सरचिटणीसपद सोडल्याने राजा यांच्याकडे पक्षाची धुरा आली.
आता 73 वर्षीय राजा यांना भाकपचे सरचिटणीस म्हणून दुसरा कार्यकाळ लाभणार आहे. भाजपचा पराभव हा भाकपचा प्रमुख अजेंडा असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी फेरनिवडीनंतर दिली.
भाकपच्या स्थापनेला 2025 यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होतील. मात्र, इतर डाव्या पक्षांप्रमाणेच भाकपही विविध निवडणुकांत पीछेहाट अनुभवत आहे.
त्यापार्श्वभूमीवर, पक्षाच्या पुनरूज्जीवनासाठी झटण्याचे आवाहन राजा यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केले. जनआंदोलनांवर भर देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.