पावसाची पुन्हा हजेरी

शहरात मुसळधार; रस्ते जलमय

पुणे – दिवसभराच्या उकाड्यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. जवळपास तासभराहून अधिक वेळ पडलेल्या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले होते. पावसाने रात्री हवेत गारवा निर्माण झाला.

मागील तीन महिने जोरदार बरसणारा मान्सून परत फिरल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला होता. परंतु, गुरुवारपासून शहराच्या विविध भागात तुरळक पाऊस झाला. शुक्रवारी पावसाचा जोर वाढला होता. तर, शनिवारी (दि. 21) आकाश अंशत: ढगाळ तर रविवारपासून आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार, पुणे येथे कमाल 33.3 अंश सेल्सिअस आणि किमान 19.4 अंश सेल्सिअस, लोहगाव येथे कमाल 33.0 अंश सेल्सिअस आणि किमान 21.6 अंश सेल्सिअस, पाषाण येथे कमाल 30 अंश सेल्सिअस आणि किमान 20.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.