IPL 2024 RCB vs PBKS, Pitch Report : आयपीएल 2024 चा सहावा सामना 25 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळतील.
दरम्यान, आरसीबी पहिला सामना गमावल्यानंतर येत आहे, तर पंजाबने आपल्या पहिल्या सामन्यात दिल्लीला पराभूत केले होते. बंगळुरूच्या खेळपट्टीवर कोणाला सर्वाधिक मदत मिळेल, गोलंदाज की फलंदाजाला हे जाणून घेऊया…
खेळपट्टी अहवाल….
एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी तीन थरांनी बनवण्यात आली आहे, ज्यामध्ये पहिला थर लाल माती आणि वाळूचा, दुसरा थर काळ्या कापसाच्या मातीचा आणि तिसरा थर चिकणमातीचा आहे. या प्रकारची खेळपट्टी चांगली उसळी आणि वेग देते ज्यामुळे फलंदाज आणि वेगवान गोलंदाजांना चांगली मदत होते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगल्या विकेट मिळतात.
दोन्ही संघांचे पूर्ण स्क्वाड….
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : आकाश दीप, अल्झारी जोसेफ, अनुज रावत, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, मयंक डागर, मोहम्मद सिराज, राजन कुमार, रजत पाटीदार, रीस टोपले, सौरव चौहान, सुयश प्रभुदेसाई, स्वप्नील सिंग, टॉम कुरान, विजयकुमार विशाक, विराट कोहली, विल जॅक, यश दयाल
IPL 2024 (#RCBvsPBKS Match 6) : ‘या’ विक्रमावर कोहली-धवनची राहणार नजर, कार्तिकही रचू शकतो इतिहास…
पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम कुरान, सिकंदर रझा, शिवम सिंग, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, नॅथन एल. , राहुल चहर, गुरनूर ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, तनय थियागराजन, प्रिन्स चौधरी, रिले रोसो.