Ram Mandir Holi : यंदाची राम मंदिरातील होळी खास होती. या होळीबाबत अयोध्येत सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. भगवान श्री रामलला यांनीही 495 वर्षांनंतर भव्य महालात होळी खेळली. यावेळी देशभरातून लोक मंदिरात पोहोचले होते.
अयोध्येत होळीच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम मठाच्या मंदिरांमध्ये रामलल्लाला अबीर गुलाल अर्पण करून होळी खेळण्याची परवानगी मागितली गेली. त्यानंतर संपूर्ण अयोध्या रंगोत्सवाच्या आनंदात तल्लीन झाली आणि सर्वत्र रंगांची उधळण सुरु करण्यात आली. | Ram Mandir Holi 2024
रामललाच्या दरबारात पुजाऱ्यांनी रामललावर फुलांचा वर्षाव केला आणि त्यांच्यासोबत होळी खेळली. यावेळी रोजच्या शृंगारासोबत गुलालाची उधळण देखील करण्यात आली. तसेच यावेळी रामलल्लाला 56 प्रकारचे पदार्थ देण्यात आले.भाविकांनी देखील या दिवशी रामलल्लाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. | Ram Mandir Holi 2024
श्री राम जन्मभूमि मंदिर में रंगोत्सव
Rangotsav at Shri Ram Janmabhoomi Mandir pic.twitter.com/nJgjb2QT7Z
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) March 25, 2024
अयोध्येत विराजमान झाल्यानंतर रामलल्ला त्यांची पहिली होळी साजरी करत आहेत. रविवारी मोठ्या संख्येने भाविक रामललाच्या दरबारात पोहोचले आणि दर्शन घेऊन धन्य झाले. रामललाच्या होळीसाठी मंदिकडून विशेष तयारी करण्यात आली होती. | Ram Mandir Holi 2024