Entertainment – अभिनेत्री रवीना टंडन तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. आजही लाखो लोक रवीनाला फॉलो करतात. रवीना टंडन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी दररोज मनोरंजक पोस्ट शेअर करताना दिसते. त्याचवेळी, अलीकडे रविना तिच्या अशाच पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
रवीना सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. मुलाखतींच्या माध्यमातून रविना तिच्या चाहत्यांना अनेक किस्से सांगत असते
रवीनाचा सोशल अकाऊंटवर असा फोटो व्हायरल होत आहे जो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहे. तिच्या ताज्या पोस्टमध्ये ‘बिच्छू वाला’ टॅटू फ्लॉंट केला आहे. चाहते तिच्या टॅटूचे कौतुक करत आहे, तिच्या या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
व्हायरल फोटोमध्ये टॅटू फ्लॉंट करताना दिसत आहे. रविनाच्या छातीवर विंचवाचा टॅटू आहे. फोटोशूटमध्ये रवीनाने हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसून येत आहे. फोटोमध्ये रवीनाचा विंचूचा टॅटू स्पष्टपणे दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. तर एका युजर्सने , ‘आता तू म्हातारा झाली आहेस’ असं म्हणत ट्रोल केले आहे. दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अखेरची यशच्या ‘KGF: Chapter 2’ या चित्रपटात दिसली होती.