Junior NTR: साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. RRR या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. या चित्रपटाने अनेक अवॉर्ड देखील मिळवले. त्यानंतर आता ज्युनियर एनटीआर ‘देवरा’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटातील ज्युनिअर एनटीआरचा फर्स्ट लुक समोर आला आहे. यातील त्याचा जबरदस्त लुक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.
‘देवरा’ मधील ज्युनियर एनटीआरचा फर्स्ट लूक व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ज्युनियर एनटीआरचा खतरनाक लुक पाहून चाहत्यांच्या मनात चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘देवरा पार्ट 1’ च्या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ज्युनियर एनटीआरच्या पात्राची झलक पाहायला मिळते. या व्हिडिओच्या शेवटी अभिनेता असे म्हणताना ऐकू येते की, ‘या समुद्राने माशांपेक्षा रक्त आणि खंजीर जास्त पाहिले आहेत. कदाचित म्हणूनच याला लाल समुद्र म्हणतात.’ यात अभिनेता अॅक्शन सीनमध्ये पाहायला मिळत आहे.
देवरा चित्रपटाच्या निर्मात्यांनी 1 जानेवारीला देवराचा व्हिडिओ 8 जानेवारीला रिलीज केला जाणार असल्याचे म्हंटले होते. त्यानुसार देवराचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. ‘देवरा’ मध्ये जूनियर एनटीआर सह अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जान्हवी ‘देवरा’चित्रपटाच्या माध्यमातून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. तर सैफ अली खान मुख्य खलनायकाच्या भूमिकेत आहे.
एनटीआर आणि सैफ एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. हा धमाकेदार चित्रपट वर्षी 5 एप्रिल 2024 रोजी रिलीज होणार आहे. तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.