अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बोनी कपूर-श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांनी ‘द आर्चिज’ चित्रपटातून डेब्यू केला आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ ७ डिसेंबर २०२३ रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला. काही लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे, तर काही लोक स्टार किड्स सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्या अभिनयावर टीका करत आहे.
चित्रपटातील स्टारकास्टचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवीना टंडनला असाच एक मीम आवडला आहे, ज्यानंतर रवीनाने अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांच्या अभिनयाची खिल्ली उडवली असल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्रीची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर ‘द आर्चीज’ संदर्भात अनेक मॉम्स व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुख खानची लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांना ट्रोल केले जात आहे. रवीना टंडनने अशाच एका मीमवर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा दिसत आहे.
त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तो सोशल मीडियावर शेअर करत नेटिझनने लिहिले की, “इथे अभिनयाचा मृत्यू झाला आहे.” या पोस्टला बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने लाईक केले होते. एका Reddit वापरकर्त्याने या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. पोस्ट शेअर करताना युजरने लिहिले की, “रवीनाला आवडले.” ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.