Raveena Tandon : केजीएफ या सुपरहिट चित्रपटातून अभिनेत्री रवीना टंडनने जबरदस्त कमबॅक केल्यानंतर ती पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये चांगली सक्रिय झाली आहे. रवीना आपलय सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या प्रत्येक गोष्टींबाबतचे अपडेट देत असते. नुकतेच अभिनेत्रीने सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.यावेळेसचा एक व्हिडीओ देखील तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रवीना टंडनची कर्मा कॉलिंग ही वेब सिरीज लवकरच रिलीज होणार आहे. दरम्यान, देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी अभिनेत्री सोमनाथ ज्योतिर्लिं येथे पोहोचली. जिथे तिने भक्तिभावाने आपल्या मुलीसह मंदिरात दर्शन घेतले. यावेळेसची खास झलक अभिनेत्रीने चाहत्यांसाठी शेअर केली आहे.”सोमनाथ! ओम त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम | उर्वरुकमिव बंधनानमृत्योमुखिया मामृतत || हर हर महादेव !” अशा कॅप्शनखाली रवीनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
कपाळावर महादेवाचा तिलक आणि हातात पूजेची थाळी घेऊन दोघी माय लेकींनी मंदिरात एंट्री केली होती. यावेळी अभिनेत्री क्रीम रंगाच्या सिल्क साडीत दिसली. तर राशा थडानी चमकदार गुलाबी रंगाच्या सलवार-कमीजमध्ये दिसली.पूजेदरम्यान अभिनेत्रीने तिच्या मुलीसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये रवीना आणि राशा शिवलिंगाला जल अर्पण करताना दिसत आहेत.
राशा लवकरच करणार बॉलिवूड डेब्यू
राशा थडानीही आईच्या पावलावर पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. तीही रवीना टंडनप्रमाणे अभिनयात करिअर करणार आहे. सध्या राशा तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. राशा अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणसोबत डेब्यू करणार आहे. अमन देवदानचाही हा बॉलिवूड डेब्यू असणार आहे.
View this post on Instagram
कर्मा कॉलिंग कधी येईल?
कर्मा कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर हा प्रोजेक्ट रिव्हेंज या अमेरिकन सिरीजवर आधारित आहे. कर्मा कॉलिंगमध्ये रवीना टंडनसोबत वरुण सूद, विक्रमजीत विर्क, वालुचा डी सूसा, गौरव शर्मा, विराफ पटेल, एमी आयला आणि बरेच काही आहेत. डिस्ने हॉटस्टारवर ही वेब सीरिज प्रसारित होईल.