New lounch : तुमच्या फोनमध्ये अशी बॅटरी आहे जी 50 वर्षे चार्ज करावी लागत नाही, असे तुम्हाला सांगण्यात आले तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, परंतु हे खरे आहे की एका चायनीज स्टार्टअपने अशी बॅटरी तयार केली आहे जी 50 वर्षे चार्ज करावी लागणार नाही.Betavolt नावाच्या कंपनीने ही बॅटरी तयार केली आहे. असा दावा केला जात आहे की ही जगातील पहिली बॅटरी आहे जिचे आयुष्य 50 वर्षांइतके असेल.
तुम्ही विचार करत असाल की जर बॅटरीचे आयुष्य ५० वर्षे असेल तर तिचा आकार किती असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या बॅटरीचा आकार एका नाण्याएवढा आहे. या बॅटरीची चाचणी देखील केली गेली आहे.जी पूर्णपणे यशस्वी ठरली आहे.
या बॅटरीचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. लवकरच याचा वापर स्मार्टफोन आणि ड्रोनमध्ये केला जाईल. या बॅटरीमध्ये अणुऊर्जेचा वापर करण्यात आला आहे.
बीटाव्होल्टच्या अणुऊर्जा बॅटरीचा वापर अवकाशात, एआय उपकरणे, मायक्रोप्रोसेसर, प्रगत सेन्सर्स, मायक्रो रोबोट्स इत्यादींमध्येही केला जाईल. याशिवाय पेसमेकर सारख्या जीव वाचवणाऱ्या उपकरणांमध्येही ही बॅटरी वापरली जाईल.
या बॅटरीचा आकार 15x15x5 मिलीमीटर आहे. यामध्ये डायमंड सेमीकंडक्टरचा वापर करण्यात आला आहे. ही बॅटरी 3 व्होल्ट पॉवरमधून 100 मायक्रोवॅट ऊर्जा निर्माण करते. 2025 पर्यंत या बॅटरीची शक्ती 1 वॅटपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. ते -60 ते 120 अंश तापमानात काम करू शकते.