मुंबई – अभिनेत्री रवीना टंडन raveena tandon तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. आजही लाखो लोक रवीनाला फॉलो करतात.
रवीना सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. मुलाखतींच्या माध्यमातून रविना तिच्या चाहत्यांना अनेक किस्से सांगत असते. लहरेन रेट्रोला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, रवीनाने तिच्या शूटिंगच्या दिवसातील एक किस्सा सांगितला आणि त्यानंतर ती कशी अस्वस्थ झाली हे सांगितले. रवीना चित्रपटांमध्ये काम करतांना नो किसींग पॉलिसीबाबत सांगितले, तसेच रवीनाने अशाच एका घटनेचाही खुलासा केला आहे.
लहरेन रेट्रोशी बोलताना रवीना raveena tandon नो किसींग पॉलिसीबाबत म्हणाली,’मला आठवतं की मी एकदा एका पुरुष अभिनेत्यासोबत रफ सीन करत होते आणि चुकून त्याच्या ओठाचा स्पर्श झाला. हे चुकून घडले आणि आवश्यक नव्हते. दृश्यानंतर, मी माझ्या खोलीत गेले आणि मला कमफर्टेबिल वाटत नसल्यामुळे उलट्या केल्या. रवीनाने पुढे सांगितले की, ‘शॉट पूर्ण झाला आणि मी वरच्या मजल्यावर गेले. मला अस्वस्थ वाटत होते. मला ते सहन होत नव्हते. मी माझे दात घासले आणि माझे तोंड शंभर वेळा धुतले.’
मुलीच्या पदार्पणाबद्दल रविना म्हणाली
याच मुलाखतीत रवीना टंडनने मुलगी राशाच्या पदार्पणाबद्दल सांगितले जी लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. रवीनाला विचारण्यात आले की राशा देखील नो किसिंग पॉलिसी फॉलो करणार का? यावर रवीना म्हणाली, ही तिची इच्छा आहे. राशा अजय देवगणचा भाचा अमन देवगणसोबत अभिषेक कपूरच्या रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रवीना टंडन raveena tandon शेवटची KGF Chapter 2 मध्ये दिसली होती. सध्या रवीनाकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत.