या चित्रपटाने जगभरात 900 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर रश्मिका मंदान्नाने तिची फी वाढवल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहे या चर्चांवर आता खुद्द रश्मिका मंदान्नाने मौन तोडले आहे.
रश्मिकाने ॲनिमलच्या यशानंतर तिची फी वाढवली आहे आणि आता ती एका चित्रपटासाठी 4 ते 4.5 कोटी रुपये घेत आहे. यावर रश्मिकाने उत्तर दिले, ‘कोण म्हणत आहे? हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं की याचा विचार करायला हवा. माझ्या निर्मात्यांनी फी का वाढवावी लागली असे विचारले तर मी म्हणेन की मीडिया साहेब म्हणत आहे. कदाचित मी त्याचे ऐकावे. आता मी काय करू?’
अशाप्रकारे रश्मिका मंदान्नाने फी वाढवण्याचे वृत्त फेटाळून लावले. ‘ॲनिमल’मधील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना रश्मिकाने सांगितले होते की, ‘चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा अशाप्रकारे लिहिली आहे. मी एक अभिनेत्री आहे जी दिग्दर्शकाची कल्पनाशक्ती जिवंत करते. मी ते पात्र अनेक वेळा साकारू शकते’
रश्मिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रुल’ या पॅन इंडिया चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच रश्मिका ‘रेनबो’ आणि ‘द गर्लफ्रेंड’ नावाच्या तेलुगू चित्रपटांसाठीही शूटिंग करत आहे. याशिवाय ती विकी कौशलसोबत ‘छावा’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे.