पुणे – शहरात दोन सामूहिक अत्याचाराच्या घटना घडल्याचे प्रकरण ताजे असताना आज सांगवीत एका ३८ वर्षीय शिक्षिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. व्याजाने पैसे देण्याच्या बहाण्याने आरोपीने हे कृत्य केले असून अत्याचारानंतर महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढत मी निवृत्त एसीपी आहे, माझं कोणी काही करू शकत नाही. कोणाला सांगितल्यास घरच्यांना जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी दिली.
विकास अवस्ती असे आरोपीचने नाव असून या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्दा दाखल करण्यात आला आहे. अवस्तीने एसीपी असल्याची बतावणी केली मात्र पोलिसांनी तो एसीपी नसल्याची माहिती दिली आहे. अत्याचार केल्यानंत अवस्ती फरार झाला आहे.
पीडित महिला शिक्षिकेला पैशाची अडचण असल्यामुळे तिने अवस्तीकडे पैशाची मागणी केली. अवस्तीने व्याजाने पैसे देण्याचे सांगत पीडितेला घरी बोलावले. त्यांनतर दोन कोऱ्या चेकवर आणि कागदावर सह्या घेतल्या. हे सर्व झाल्यानंतर अवस्तीने पीडितेस सॉफ्ट ड्रिंक दिली व त्यानंतर अत्याचार केला.
आरोपी ऐवढ्यावर न थाबंता त्याने पीडितेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून महिलेला पैसे न देता पाठवून दिले. या घटनेमुळे पीडित शिक्षिका घाबरली होती. पीडित महिला कार्यरत असलेल्या शाळेत आरोपी अवस्ती गेला. तिथे पीडितेला विवस्त्र अवस्थेतील फोटो दाखवले व शाळेत आणि घरच्या व्यक्तींना फोटो दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली.
त्यानंतर पुन्हा आरोपीने पीडितेला दुचाकीवर बसवून घरी नेले. बदनामी होईल या भीतीने पीडित शिक्षिका दुचाकीवर बसली. तिला आरोपी घरी घेऊन गेला, तिथे पुन्हा जबरदस्ती करत बलात्कार केला. आरडाओरडा केलास तर मारून टाकेन, अशी धमकी अवस्तीने दिली.
अत्याचारानतंर आरोपीने तू जर हे घरी सांगितलंस तर तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही. मी निवृत्त एसीपी आहे, कोणी ही माझे काही करू शकत नाही अशी धमकी दिली. अवस्तीच्या त्रास जास्तच वाढल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली व तक्रार दाखल केली. पुढिल तपास पोलिस करत आहेत.