रणवीर सिंह त्याच्या फॅन्समध्ये खूपच पॉप्युलर आहे. आपल्या फॅन्सना तो अगदी सहजपणे भेटही असतो. अलिकडेच “83′ च्या शुटिंगसाठी तो लंडनला गेला आहे. तिथल्या साऊथहॉलमध्ये त्याच्या फॅन्सनी त्याला गराडा घातला. त्यावेळी त्याच्या फॅन्सनी अक्षरशः ढोल ताशाच्या गजरामध्ये त्याचे स्वागत केले.
तो तिथे येणार आहे, अशी खबर मिळाल्यावर साऊथहॉलमध्ये त्याचे फॅन्स आगोदरच एकत्र आले होते. तो येताच त्यांनी त्याला गराडा घातला. रणवीरनेही सर्व फॅन्सशी शेकहॅन्ड केला आणि त्यांच्याबरोबर सेल्फीही काढले. फॅन्सबरोबरच्या या भेटीचा व्हिडीओ एका फॅनने सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर एका वयस्कर लेडी फॅनबरोबर डान्स करताना दिसतो आहे. ही वयस्कर महिलाही रणवीरबरोबर मनापासून डान्स करते आहे. रणवीरच्या या सहज आणि मोकळ्या स्वभावाचे लोक खूप मनापासून कौतुक करताना दिसत आहेत.
त्याच्या फॅन्समध्ये तो एवढा लोकप्रिय असण्याचे आणखी एक कारण आहे. तो सततच आपला ड्रेसिंग सेन्स बदलत असतो. त्याच्या अफलातून ड्रेसमुळेही त्याची क्रेझ युवकांमध्ये कमालिची वाढली आहे. त्याची फॅशन अनेकजण फॉलो करत असतात.