150-160cc Bikes । best Mileage : जर तुम्हाला 150cc-160cc ची बाइक घ्यायची असेल, तर या लेखात आम्ही तुम्हाला अशा पाच मोटरसायकलींबद्दल सांगणार आहोत ज्या एकदम दमदार मायलेज देतात. ज्यामुळे तुमचे भरपूर पैसे देखील वाचणार आहेत.
Honda सध्या 150-160cc सेगमेंटमध्ये Unicorn आणि SP160 विकत आहे. हे दोन्ही मॉडेल्स एकाच 162.7cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिनसह येतात. हे इंजिन युनिकॉर्नमध्ये 60kmpl मायलेज देऊ शकते तर SP160 मध्ये 65kmpl मायलेज देणारे आहे. असं कंपनी सांगते.
TVS Apache RTR 160 मध्ये 159.7cc एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 15.82bhp आणि 13.85Nm आउटपुट करते. टीव्हीएसचा दावा आहे की Apache RTR 160 ही 60kmpl मायलेज देऊ शकते.
बजाज पल्सर एन 160 हे 51.6 किमी प्रति लिटर (एआरएआय-रेट केलेले) मायलेज देखील देते. Pulsar N160 ची किंमत 1.33 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Hero Xtreme 160R मध्ये 160cc, एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 8,500rpm वर 15bhp आणि 6,500rpm वर 14Nm जनरेट करते. हे 49 kmpl चे मायलेज देते.
बजाज पल्सर Pulsar N150 त्याच्या मोठ्या आणि अधिक शक्तिशाली मॉडेल Pulsar N160 पेक्षा कमी मायलेज देते. नवीन जनरेशन 150cc पल्सर 47kmpl मायलेज देते असा दावा कंपनी करते.