रांजणगाव गणपती (वार्ताहर)- येथील दोन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील पाच जणांचे वैद्यकिय अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे रांजणगाव प्राथमिक आरोग्य विभागाचे वैद्यकिय अधिकारी डाँ. महेश सातव यांनी सांगितले.
रांजणगाव गणपती येथे २५ जून रोजी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. त्या रुग्णाच्या संर्पकातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. या दोन जणांचे स्वँब सोमवारी तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचा तपासणी अहवाल आज मंगळवारी दुपारी निगेटिव्ह आला असल्याने रांजणगाव येथील कोरोनाची साखळी तुटल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.
रांजणगाव येथील कोरोनाची साखळी तुटली असली तरी नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन सर्जेराव खेडकर यांनी केले आहे.