Entertainment News – बॉलिवूडमध्ये लवकरच अभिनेता रणदीप हुडा आणि त्याची दीर्घकाळाची मैत्रीण लिन लैशराम लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये हे जोडपे लग्न करणार आहे. हे लग्न अतिशय खाजगी असेल. फक्त या जोडप्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय यात सहभागी होणार आहे. हे लग्न फक्त मुंबईतच होणार आहे.
‘रणदीप हुड्डा एक प्राइवेट पर्सन आहे, आणि त्याला त्याच्या लग्नाकडे मीडियाचे लक्ष वेधायचे नाही. लग्न पार पडल्यानंतर त्याची घोषणा केली जाईल. 47 वर्षीय रणदीप आणि 37 वर्षीय लिन आधी कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाही. मात्र, त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टने त्यांच्या नात्याला पुष्टी दिली. रणदीपने 2021 मध्ये लिनच्या वाढदिवशी पहिल्यांदा आपल्या नात्याबद्दल सांगितले होते. लिन लैशराम ही मणिपूरची असून ती भारतीय मॉडेल आहे.
लिन लैशरामने रणदीपला त्याच्या ४७व्या वाढदिवसानिमित्त लव्ह पोस्ट शेअर केली, आणि लिहिले, ‘हॅपी बर्थडे माय हॉट फज.’ सफारीदरम्यान फोटोसाठी पोज देताना दोघेही बेज शर्ट, कॅप आणि गळ्यात तत्सम स्कार्फ घातलेले दिसले.
रणदीपच्या वर्क फ्रंटवरबाबत बोलायचे झाल्यास, पुढे ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ मध्ये तो दिसणार आहे, ज्यामध्ये तो स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका साकारणार आहे. रणदीप या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. अनेक वर्षांपासून अनेकांचा हार्टथ्रोब असलेला रणदीप आपल्या लग्नामुळे अनेकांची मने तोडणार हे उघड आहे.