Umesh Kamat : सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक सेलेब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच मराठी कलाकारांचीही सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळते. अनेकदा चाहते सोशल मीडियाद्वारे त्यांचे कौतुक करताना दिसतात. सेलेब्रिटी देखील चाहत्यांना उत्तर देतात. यावेळी अभिनेता उमेश कामत (Umesh kamat) याच्याकडे चाहत्याने एक भलताच सल्ला मागितला आहे. चाहत्याने केलेल्या मेसेजचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एका चाहत्याने उमेशला इन्स्टाग्रामवर मेसेज करत त्याची व्यथा मांडली आहे. याचा फोटो उमेशने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. “माझी गर्लफ्रेंड नाराज झाली आहे. गेले एक महिना ती माझ्याशी बोलत नाही. तिला बोल म्हणतोय तरी बोलत नाही. तिने मला ब्लॉक केलं आहे. दुसऱ्या नंबरने मेसेज केला तरी ऐकत नाही,” असा मेसेज चाहत्याने उमेशला केला होता. मात्र उमेशलाच चाहत्याच्या या प्रश्नाला नेमक काय उत्तर द्यावे कळालेले नाही.
उमेशन चाहत्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट इन्स्टा स्टोरीवर शेअर करत लिहील की, “याला मी कशी बरं मदत करू?” असं म्हटलं आहे. उमेशने त्याच्या चाहत्याचा प्रश्न मांडत अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, सध्या उमेश कामत ‘जर तरची गोष्ट’ या नाटकामुळे चर्चेत आहे. यात अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत मुख्य भूमिकेत आहे. सध्या या नाटकाला अनेक प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.