सोशल मीडियावर रणबीरचे फेक अकाउंट – कतरिना

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी “भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, ती अरबाज खानच्या चॅट शोला उपस्थित होती. या चॅट शोमध्ये तिने आपल्या पर्सनल लाईफपासून सोशल मीडिया आणि आपल्या एक्‍स-बॉयफ्रेंड रणबीर कपूरबाबत खुलेआमपणे चर्चा केली. यावेळी तिने सोशल मीडियावर रणबीरचे एक फेक अकाउंट असल्याचेही सांगितले.

चॅट शोमध्ये अरबाजने कतरिना विचारले की, सोशल मीडियावर तुझे फेक अकाउंट आहे. ज्यातून तू अन्य लोकांवर लक्ष्य ठेवते. यावर कतरिना म्हणाली, माझे कोणतेही फेक अकाउंट नाही. पण रणबीरबाबत सांगू शकत नाही. त्याचे फेक अकाउंट असून त्याचा तो वापर करतो. तसेच रणबीरनेच मला इंस्टाग्रामबाबत माहिती दिली आणि ते कसे वापरायचे ते शिकविले.

ही चर्चा रंगली असताना कतरिनाला रणबीरसोबत बिघडलेल्या संबंधाबाबतही विचारण्यात आले. यावर ती म्हणाली, यासाठी रणबीर जेवढा जबाबदार आहे, तेवढीच मीही आहे. आज भलेही दोघांचे रस्ते वेगवेगळे असले तरी दोघांमध्ये एकमेकांबाबत कोणतेही वितुष्ट नाही. दरम्यान, कतरिनाने आपल्या करिअरवर फोकस केला आहे, तर रणबीर सध्या आलिया भट्‌टला डेट करत आहे. ही जोडी लवकरच “ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.