केजरीवालांनी ओव्हर स्मार्ट बनण्याचा प्रयत्न केला – सिब्बल

नवी दिल्ली – दिल्ली आणि अन्य राज्यात कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षात होऊ घातलेली आघाडी कॉंग्रेसच्या अडेल पणामुळे होऊ शकली नाही असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यावर कॉंग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की दिल्लीत दोन्हीपक्षांची आघाडी झाली असती तर ते फायदेशीर ठरले असते पण केजरीवालांना तेवढेच अपेक्षित नव्हते. कॉंग्रेसने त्यांच्याशी अन्य राज्यांतही आघाडी करावी अशी त्यांची अपेक्षा होती.

कॉंग्रेसशी आघाडी करून आपला बेस वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी ओव्हर स्मार्टपणा दाखवला होता. अशी टीका त्यांनी केली. आम्ही त्यांना दिल्लीत चार-तीन जागांचा फॉर्म्युला दिला होता. पण त्यांनी गोवा आणि पंजाब, हरियानातील आघाडीचा आग्रह धरला. नंतर त्यांनी गोवा आणि पंजाबचा आग्रह सोडला आणि हरियानातील आघाडीसाठी ते अडून बसले होते. त्यांचे हरियानात अस्तित्वच नाही त्यामुळे आम्ही त्यांच्याशी तेथे आघाडी करण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही असे सिब्बल यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.