प्रियांकाच्या भावाचे लग्न रद्द

प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचे ठरलेले लग्न रद्द झाले आहे. प्रियांकाची आई मधु चोप्रानेच ही माहिती दिली आहे. सिद्धार्थचे लग्न इशिता कुमारबरोबर ठरले होते. मात्र आता परस्परांच्या सहमतीने हे लग्न रद्द करण्यत आले आहे. सिद्धार्थ सध्या लग्नासाठी तयार नाही. त्याला आणखीन काही काळ मिळायला हवा आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मधु चोप्रांनी सांगितले. सिद्धार्थ आणि इशिताच्या लग्नाची तारीख जाहीर केली गेली नव्हतीच. पण गेल्या आठवड्यातलाच मुहुर्त काढला गेला होता, असे समजते आहे.

मात्र ऐनवेळी इशिता कुमारचे इमर्जन्सी काही ऑपरेशन करावे लागले होते. त्यामुळे लग्न स्थगित करायला लागल्याच्या बातम्या एन्टरटेनमेंट वेबसाईटवर प्रसिद्ध व्हायला लागल्या होत्या. त्याच सुमारास काही तरी गडबड आहे, असा अंदाज व्यक्‍त केल जायला लागला होता. शुक्रवारी स्थगित झालेले लग्न अखेर शनिवारी रद्द झाल्याचे मधु चोप्रांनी स्पष्ट करून टाकले. इशिता कुमारने इन्स्टाग्रामवरचे लग्नाशी संबंधित फोटो डिलीट करून टाकले आहेत. “नवी सुरुवात’, “सुंदर अंत’ अशी कॅप्शन असलेला स्वतःच्या फोटो तिने पोस्ट केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.