Bollywood News : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. रणबीर आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र येणार असून या चित्रपटाचा टीझर आधीच चर्चेचा विषय बनलाय. लवकरच चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज होणार असून, त्याचे पोस्टर आज रिलीज करण्यात आले आहे.
View this post on Instagram
‘अॅनिमल’चे हे पहिले गाणे असेल जे निर्माते आज रिलीज करणार आहे. या गाण्याचे शीर्षक ‘हुआ मैं’ असे असेल, या चित्रपटाचे पोस्टर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या गाण्याचे पोस्टर शेअर करताना रश्मिका मंदान्नाने लिहिले की, “‘हुआ मैं’ रिलीज होणार. हे गाणे धमाकेदार असेल. प्रत्येक भाषेत मला वैयक्तिकरित्या हे गाणे खूप आवडले.”
पोस्टरबद्दल सांगायचे तर, रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना विमानात बसून लिप लॉक करताना दिसत आहेत. चित्रपटात रणबीर कपूर खूप श्रीमंत दाखवण्यात आला आहे, हे एक रोमँटिक गाणे असण्याची शक्यता आहे जे रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या पात्रांच्या लव्ह स्टोरी सांगते.
निर्मात्यांनी गाणे रिलीज होण्यापूर्वी हे किसींग पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये दोघांची केमिस्ट्री दिसून येते. अनेक यूजर्सनी हार्ट आणि फायर इमोजी या पोस्टरवर कमेंट सेंड केल्या आहेत. एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, “हार्ड किसिंग’ दरम्यान, अर्जुन रेड्डी हा दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा ब्लॉकबस्टर हिट होता, ज्याचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंह’ होता.