मुंबई – लॉकडाउनमुळे अनेकजण घरापासून दूर अडकून बसलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हात पुढे केला आहे. त्यांनी एका वयोवृद्ध आणि गरजू मराठीतील धुमधडाका’या चित्रपटात भूमिका साकारणार्या ऐश्वर्या राणेला आसरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या या सिंधुदुर्ग येथील त्यांच्या गावाच्या दिशेने निघाल्या होत्या. परंतु, लॉकडाउनमुळे पोलिसांनी त्यांना अडवून मुंबईत परत जाण्याचे आदेश दिले. दरम्यान, त्यांचे कपडे आणि सर्व सामान चोरीला गेले. त्यानंतर त्या मुंबईला परतल्या आणि त्यांनी आठवले यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून रामदास आठवलेंनी ऐश्वर्या यांना त्यांच्या घरात आसरा दिला आहे.
दरम्यान, ऐश्वर्या यांनी ‘धुमधडाका’मध्ये अशोक सराफ यांच्या नायिकेचे काम केले होते. त्यांनी या चित्रपटात अशोक सराफ यांच्याबरोबर केलेले प्रियतम्मा हे गाणे विशेष गाजले होते. परंतु अशोक सराफ यांच्या प्रियतम्मा ओखळताही येणार नाही अशा अवस्थेत आहेत.