Ayodhya Ram Mandir : अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. रामललाच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आली असून, मुख्य अभिषेक सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. परंतु 15 जानेवारीपासूनच पूजा आणि विधी यासारखे कार्यक्रम सुरु झाले आहेत. 22 जानेवारी रोजी दुपारी प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे.
22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल. 22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात येणार आहे.
दरम्यान, आता अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा समारंभाचे निमंत्रण सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसह निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करणाऱ्या खंडपीठाचा भाग असलेल्या पाच न्यायाधीशांना 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या अभिषेक सोहळ्याला साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
यामध्ये न्यायाधीश रंजन गोगोई, शरद अरविंद बोबडे, डीवाय चंद्रचूड, अशोक भूषण, एस. अब्दुल नजीर, रंजन गोगोई त्यावेळी CJI होते. तर पॅनेलमध्ये उपस्थित असलेले डीवाय चंद्रचूड सध्या सरन्यायाधीश आहेत. या सर्वांना या समारंभाचे निमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिर-बाबरी मशीद वादावर 9 नोव्हेंबर 2019 रोजी अंतिम निर्णय घेण्यात आला.