Ayodhya Ram Mandir Song । सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात ‘राम लल्ला’चा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं होतं. यावेळी सगळीकडे राम भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याचं चित्र दिसून आलं. संपूर्ण देश राम भक्तीत तल्लीन झाला होता.
यावेळी फक्त अयोध्याच नव्हे, तर अवघा देश ‘राम’मय झाला होता. महाराष्ट्रातही राम भक्तांनी राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा साजरा केला. अयोध्या रामजन्मभूमी येथे बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राम मंदिर उभारण्यात आलं. आणि प्राण प्रतिष्ठा करण्यात आली.
यावेळी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रभू श्रीरामाचाच गजर होतं होता. त्या निमित्ताने दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अनुश्री फिल्म्सच्या वतीने मयुर तातुसकर यांच्या संकल्पनेतून ‘जय श्री राम’ हे गाणं “व्हिडीओ पॅलेस” या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालं होतं.
श्रेयस देशपांडे, चेझन लॉयर यांनी गायलेलं तर मयुर तातुसकर, श्रेयस देशपांडे, साई बनाला यांनी शब्दबद्ध केलेल्या जय श्री राम’ ह्या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाला असून, या काळात घराघरात हे गाणं ऐकलं जात होतं.
मयुर शेखर तातुसकर यांनी या गाण्याची निर्मिती केली असून संगीत दिग्दर्शक श्रेयस नंदा देशपांडे यांचे आहे. या गाण्यासाठी आलाप अमोल पारवे यांचा असून प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांचे सहकार्य लाभले आहे.
दरम्यान, आता दिनांक 17 एप्रिल, 2024 रोजी म्हणजेच श्री राम नवमीच्या निमित्ताने “जय श्री राम” हे गाणं आपण “व्हिडीओ पॅलेस” या युट्यूब चॅनलवर पाहू शकता.