Ram Mandir Pran Pratishtha : देशातील ऐतिहासिक राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसा जसा जवळ येत आहे तसा देश राममय झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ देशातच नाही तर संपूर्ण जग राममय झाला असल्याचे दिसत आहे. कारण अयोध्येत तयार झालेल्या प्रभू श्रीराम मंदिरासाठी चक्क अफगाणिस्तानातून खास भेट आली आहे.
अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेकाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यासाठी आठवडाभरापूर्वी सुरू असलेल्या वैदिक विधीचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान, जगभरातून श्री राम मंदिराला भेटवस्तू येत आहेत त्यात अफगाणिस्तानचाही समावेश आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी काश्मीर, तामिळनाडू आणि अफगाणिस्तानमधून मिळालेल्या भेटवस्तू श्री राम मंदिराचे यजमान अनिल मिश्रा यांच्याकडे सुपूर्द केल्या असल्याचे एका वृत्तसंस्थेने सांगितले आहे.
#WATCH | Ayodhya, UP: Vishwa Hindu Parishad President Alok Kumar hands over gifts received from Kashmir, Tamil Nadu, and Afghanistan to ‘Yajman’ of Shri Ram Temple Anil Mishra.
He says, “Muslim brothers and sisters from Kashmir came to meet me and expressed their happiness at… pic.twitter.com/g8Vywcde6J
— ANI (@ANI) January 20, 2024
आमचे धर्म वेगळे आहेत पण आमचे पूर्वज एकच (Ram Mandir Pran Pratishtha)
आलोक कुमार यांनी दावा केला आहे की, श्री राम मंदिराच्या उभारणीमुळे मुस्लिम समाजही खूश आहे. ते म्हणाले, “काश्मीरमधील मुस्लिम बांधव आणि भगिनी मला भेटायला आले आणि त्यांनी राम मंदिराच्या उभारणीबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की आम्ही भिन्न धर्माचे पालन करत असलो तरी आमचे पूर्वज एकच आहेत. त्यांनी 2 किलो सेंद्रिय पद्धतीने उत्पादित शुद्ध केशर मंदिरासाठी आपल्याकडे सुपूर्द केले. ”
काबूल नदीचे पाणीही भेट म्हणून मिळाले (Ram Mandir Pran Pratishtha)
पुढे आलोक कुमार यांनी, जगातील इतर देशांव्यतिरिक्त त्यांना अफगाणिस्तानकडूनही एक खास भेट मिळाली आहे. प्रसिद्ध काबूल नदीचे पाणी, ज्याला स्थानिक भाषेत “कुभा” म्हणतात, श्री राम मंदिरात प्रभू रामाच्या अभिषेकासाठी भेट म्हणून मिळाले आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले. आलोक कुमार म्हणतात, “तामिळनाडूच्या रेशीम उत्पादकांनी श्री राम मंदिराच्या चित्रासह विणलेल्या रेशमी पत्र्या पाठवल्या आहेत.