Rakul Preet Singh – बॉलिवूडच्या सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक असलेल्या रकुल प्रीत सिंग – जॅकी भगनानी लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. या लव्हबर्ड्सचे डेस्टिनेशन वेडिंग गोव्यात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे जोडपे ज्या दिवशी सात फेरे घेणार आहेत त्या दिवसाची काही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रकुल आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारीला गोव्यात त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. 19 आणि 20 फेब्रुवारीला या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स होणार असल्याचेही बातमी सध्या व्हायरल होत आहे.
हे कपल लग्नाची तारीख गुप्त ठेवू इच्छित आहे. डिझायनर्सपासून फोटोग्राफरपर्यंत कोणालाही या तारखेची माहिती देण्यात आलेली नाही. लग्न गोव्यात होत असल्याने प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात तारखा देण्यात आल्या आहेत. हे संपूर्ण बॉलिवूड लग्न असणार आहे. रकुलच्या लग्नाचा लेहेंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानी डिझाइन करत आहे. लग्नानंतर हे जोडपे पुन्हा कामावर परतणार आहेत. या जोडप्याने अद्याप त्यांच्या लग्नाबाबत अधिकृतपणे काहीही दुजोरा दिलेला नाही.
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचे प्रेमप्रकरण कोणापासून लपलेले नाही. हे जोडपे 2021 पासून एकमेकांना डेट करत आहेत.एका मुलाखतीदरम्यान रकुलने तिच्या जॅकीसोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते. रकुलने सांगितले होते की, “आम्ही दोघे शेजारी होतो पण आमची कधीच चर्चा झाली नाही. जेव्हा लॉकडाऊन लागू झाला तेव्हा आम्ही एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटलो. त्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो. आम्ही बराच वेळ एकमेकांच्या कंपनीत होतो. त्यानंतर आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.