मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा ते ट्विटरवर अशा गोष्टी शेअर करतो ज्या व्हायरल होतात. नुकतच त्यांनी RRR फेम अभिनेता राम चरणसोबतचा असाच एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आनंद महिंद्रा यांची हैदराबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अभिनेता राम चरणसोबत भेट झाली. या दरम्यानचा हा व्हिडीओ आहे.
या व्हिडिओमध्ये आनंद महिंद्रा रामचरण कडून गाण्याच्या स्टेप्स शिकताना दिसत आहे. याबाबतचा एक व्हिडिओही त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राम चरण आनंद महिंद्रा यांना त्यांच्या चित्रपटातील गाण्यावर डान्स करायला शिकवत आहे. व्हिडिओ शेअर करताना आनंदने लिहिले की, “शर्यतीव्यतिरिक्त, हैदराबादध्ये रामचरणकडून गाण्याच्या बेसिक स्टेप्स शिकून बोनस मिळाला. धन्यवाद मित्रा… तुम्हाला ऑस्करसाठी शुभेच्छा.”
राम चरणनेही या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले, “आनंद महिंद्राजी तुम्ही माझ्यापेक्षा वेगाने पुढे गेलात. तो एक सुपर मजेदार संवाद होता. तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद”. महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओवर चाहत्यांनी देखील कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Well apart from the race, one real bonus at the #HyderabadEPrix was getting lessons from @AlwaysRamCharan on the basic #NaatuNaatu steps. Thank you and good luck at the Oscars, my friend! pic.twitter.com/YUWTcCvCdw
— anand mahindra (@anandmahindra) February 11, 2023
नुकतेच आरआरआरचे ‘नाटू नाटू’ हे गाणे ऑस्करच्या ओरिजिनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये नामांकन झाले आहे.आर आर आर हा गेल्या वर्षातील सुपरहिट सिनेमा ठरला होता. यामुळे जगभरामध्ये साऊथ सिनेमांची वाहवाह झाली होती. या चित्रपटाने जगभरात 1250 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. याआधी राजामौली यांनी बाहुबलीसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत.