मुंबई – दक्षिण भारतातील सुपरस्टार अल्लू अर्जुनाचा ‘पुष्पा द राइज’ सिनेमा मागील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा बिग बजेट सिनेमा असून, यामध्ये दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे लीड रोलमध्ये दिसून आले होते. तसेच हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला मराठमोळ्या कलाकाराने आपला आवाज दिला आहे.
प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याने ‘पुष्पा द राइज’ या हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमा आपला दिला असून, त्याच्या या कामाचे सर्वांनीच कौतुक केलं आहे. हा सिनेमा हिट झाल्यापासून श्रेयश प्रसिद्धीच्या शिरखराव पोहचला आहे. त्याच्या सोशल मीडिया फॅन्समध्ये देखील मोठी भर पडल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, अभिनेता अभिनेता श्रेयस तळपदे याने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. मात्र, यातील काही फोटोंमध्ये तो रक्तात माखलेला दिसत आहे, जे पाहून चाहतेही काळजीत पडले. हे फोटो शेअर करताना अभिनेत्याने त्यामागची संपूर्ण गोष्टही सांगितली. हा सिनेमा त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा भाग असल्याचं तो म्हणाला.
View this post on Instagram
श्रेयसने ‘द हँगमॅन’ सिनेमाची गोष्ट शेअर केली. या सिनेमात त्याच्या सोबत दिग्गज अभिनेते ओम पुरी आणि गुलशन ग्रोव्हर हे देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. तर, या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल भंडारी यांनी केले होते. दरम्यान, रक्ताने माखलेल्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या असून, त्याचा हा फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, हे फोटो शेअर करताना श्रेयस म्हणाला… दिग्गज अभिनेते ओम पुरी आणि गुलशन ग्रोव्हर यांच्यासोबतचा हा माझा पहिला सिनेमा होता. त्यांनी माझी एखाद्या मुलाप्रमाणे काळजी घेतली होती. आम्हाला अजूनही तुमची आठवण येते ओम जी. असं म्हणत त्यानी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचं यातून दिसून येत आहे.