देशभर करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कहर झाला आहे. एकूण साडे 4 हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला आहे आणि 136 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफ रुग्णसेवेसाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. अशातच काही जणांना डॉक्टरांवर हल्ले केले. शिवीगाळ केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाला.
व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शेजारील डॉक्टर महिलेला शिवीगाळ करताना दिसतो आहे. याच डॉक्टरने गुपचूप या व्यक्तीचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी हा माणूस दमदाटी करायला लागला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड झाल्यावर ऋचा चढ्ढा जाम भडकली आहे. या माणसाला तुरुंगात टाकले पाहिजे, असे ऋचा म्हणाली. तिच्या या रागावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकांनी तिच्या भावनांशी सहमती दर्शवली आहे. कंगणा रणावतच्या “पंगा’मध्ये ऋचा दिसली होती. अली फजल बरोबर तिचा विवाह ठरल्यानंतर एन्गेजमेंट रिंग घातलेला फोटो तिने शेअर केला होता. तेंव्हापासून ती सोशल मीडियावर फारशी दिसली नव्हती. आता लॉकडाऊन संपेपर्यंत तिच्या लग्नाचा काहीही अपडेट मिळणार नाही.