धक्कादायक! पुण्यात एकाच दिवसात ५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

पुणे – राज्यात करोनाबाधितांचा आकडा हजाराच्या पार गेला असून मृत्यूचा दरही वाढला आहे. आज पुण्यात करोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील मृत्यू झालेल्यांची संख्या १३वर पोहचली आहे.

माहितीनुसार, ससून रुग्णालयातील ३ जणांचा तर नायडू आणि नोबेलमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकट्या पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. पुणे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, कोंढवा ते आरटीओ परिसर “सील’ करण्याच्या आदेशा पाठोपाठ पुणे पोलिसांनी आता येथे 100 टक्‍के कर्फ्यू लागू केला. रस्त्यावर फिरणे, जीवनावश्‍यक वस्तू खरेदीनिमित्ताने बाहेर पडणे तर दूरच परंतु नागरिकांना आता दारातही थांबता येणार नाही. तसे केल्यास थेट पोलिसांच्या दंडुका नव्हे तर कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.