गुगल मॅपवर दिसणार अन्न आणि निवाऱ्याची केंद्र

लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीतांना मदत

पुणे – सध्या देशभरात लॉकडाऊन चालू आहे. त्यामुळे अनेक राज्यात स्थलांतरीत कामगार अडकले आहेत. सध्याच्या परिस्थितीत अन्नधान्याची दुकाने कुठे आहेत आणि इतर माहितीसाठी नागरिक इंटरनेटचा वापर करीत आहेत. या परिस्थितीत अशी माहिती भारतातील नागरीकांना गुगल मॅपवर दिसू शकणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

गुगल कंपनीने या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य सरकार बरोबर आम्ही कोणत्या ठिकाणी कोणत्या सोयी उपलब्ध आहेत याची माहिती घेऊन ती मॅपवर अपलोड करीत आहोत. यामुळे ग्राहकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये विविध सोयी कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत याची माहिती लवकर मिळू शकणार आहे.

सध्या, ही सोय 30 शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून आगामी काळामध्ये ही सोय आणखी शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी वेगात प्रयत्न करण्यात येत आहेत. मोबाइल वापरकर्त्यांनी फुड शेल्टर्स, नाईट शेल्टर्स अशी विचारणा केल्यानंतर यामध्ये ही माहिती दिसू शकणार आहे. सध्या, ही माहिती इंग्रजीमध्ये उपलब्ध असून लवकरच हिंदीत उपलब्ध केली जाईल. त्यानंतर भारतातील विविध भाषांमध्ये ही माहिती उपलब्ध करून देण्यावर काम चालू असल्याचे या कंपनीने म्हटले आहेत. करोनामुळे बरेच स्थलांतरित कामगार विविध शहरांमध्ये अडकले आहेत. त्यांना मदत कुठे मिळेल याची माहिती उपलब्ध नसते. त्यासाठी या सेवांचा उपयोग होऊ शकतो. आगामी काळातही नागरिकांना उपयुक्त होतील, अशा सेवा उपलब्ध करण्यासाठी गुगल प्रयत्न करीत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.