नवी दिल्ली – निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार 15 मे 2022 पासून मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील.
सुशील चंद्र यांचा कार्यकाळ 14 मे 2022 रोजी समाप्त होणार आहे. कायदा मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीची घोषणा केली.
कायदामंत्र्यांनी ट्विट केले की, “घटनेच्या कलम 324 च्या कलम (2) नुसार, राष्ट्रपतींनी राजीव कुमार यांची 15 मे 2022 पासून मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. राजीव कुमार यांना माझ्या शुभेच्छा.” सुशील चंद्र यांचा कार्यकाळ शनिवारी पूर्ण होत असल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. निवडणूक आयोगात रुजू होण्यापूर्वी ते एंटरप्रायझेस सिलेक्शन बोर्डाचे अध्यक्ष होते. ते एप्रिल 2020 मध्ये पीईएसबीचे अध्यक्ष म्हणून रुजू झाले होते. राजीव हे बिहार/झारखंड केडरचे 1984 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. ते फेब्रुवारी 2020 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत.